एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ चे परीक्षक ट्रोल! अँकर मृण्मयीने दिले सडेतोड उत्तर..पहा

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ ची उत्सुकता साऱ्या महाराष्ट्राला होती. लहान मुलांना सुरात गाताना बघणं हा खरंच एक सोहळा आहे आणि दर्दी प्रेक्षक हा सोहळा आवर्जून अनुभवतात. या उत्सुकतेत भर पाडली ती या कार्यक्रमाच्या परीक्षकांनी. २००६ ला प्रसारीत झालेल्या ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ च्या पहिल्या पर्वात प्रसिद्ध झालेली पंचरत्ने कार्तिकी गायकवाड, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर, रोहित राऊत आणि मुग्धा वैशंपायन आता केवळ लिटिल चॅम्प्स राहिले असून नावाजलेले गायक आणि गायिका झाले आहेत.

नवे पर्व प्रसारीत झाले मात्र कार्यक्रम प्रसिद्ध झाला तो वेगळ्याच कारणांसाठी. परीक्षकांच्या ओव्हर ऍक्टिंगने प्रेक्षकांनी परीक्षकांना सोशल मीडिया वर ट्रोल करायला सुरुवात केली. ‘सारेगमप’ च्या जुन्या परीक्षकांची हे नवे परीक्षक ‘कॉपी’ करतात असंही बोललं जाऊ लागलं. कार्यक्रमाची सूत्रसंचालिका मृण्मयी देशपांडे देखील या कार्यक्रमातील तिच्या अँकरींग मुळे ट्रोल होत आहे. अजून सुरुवात असल्याने या कार्यक्रमाचे फार भाग प्रसारीत झाले नाहीयेत. मात्र त्याआधीच या ट्रोलिंग प्रकरणामुळे हा कार्यक्रम प्रकाशझोतात आला आहे.

या कार्यक्रमाची सूत्रसंचालक मृण्मयी देशपांडे सोशल मीडिया वर बरीच सक्रिय असते. आपल्या नव्या नव्या प्रोजेक्ट्स बद्दल ती आपल्या चाहत्यांना आपल्या सोशल मीडिया अकाऊंट द्वारे अपडेट करत असते. प्रेक्षकांची मते ऐकत कधी कधी त्यांना उत्तर द्यायचेही काम ती करते. यावेळी मात्र ही ट्रोलिंग ची बाब मृण्मयीच्या कानावर गेली आणि मग मात्र तिने या प्रकरणाचा चांगलाच समाचार घेतला.

मृण्मयीच्या अकाऊंट वर एका ट्रोलरने नुकतीच ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ च्या परीक्षकांना ट्रोल करत एक कमेंट केली. यात त्या ट्रोलरने म्हटले आहे, “समोर असलेले जज आणि अँकर खूपच आरडा ओरडा करतात.” यावर मृण्मयीने अत्यंत सडेतोड असे उत्तर दिले आहे. तिच्या या उत्तराने अनेकांचे लक्ष या प्रकरणाकडे वेधून घेतले. असं काय उत्तर दिलं मृण्मयीने या ट्रोलर्स ना?

त्या कमेंट वर उत्तर देत मृण्मयी म्हणते, “तुम्ही या मुलांचं गाणं ऐकून काय केलं असतं? हाताची घडी घालून शांत बसला असतात का?” तिच्या या सडेतोड प्रश्न वजा उत्तराने अनेक ट्रोलर्सना त्यांचे उत्तर मिळाले असावे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ च्या परीक्षकांना आणि अँकरला ट्रोल करणारे सोशल मीडिया वर बरेच जण असले तरी मृण्मयीच्या उत्तराचे समर्थन करणारे, तिला पाठींबा देणारेही वाढत आहेत असे दिसून येते.

तर वाचकहो, तुम्हाला मृण्मयीच्या या उत्तराबद्दल काय वाटतं? आम्हाला तुमचे अमूल्य मत कळवायला विसरू नका.

You might also like