एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

या गोड बालकलाकाराला ओळखलं का? आता आहे एक प्रसिद्ध अभिनेत्री..पहा

श्रेया बुगडे, बस्स! नाम ही काफी है! ‘चला हवा येऊ द्या’ मधल्या आपल्या हास्य अदाकारीनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी श्रेया बुगडे. हे नाव माहीत नाही असा माणूसच महाराष्ट्रात सापडणार नाही. ‘चला हवा येऊ द्या’ च्या स्टेज वरील एकमेव महिला कलाकार ही तिची अजून एक ओळख. ही एकमेव महिला कलाकार ‘चला हवा येऊ द्या’ मधल्या दिग्गज कलाकारांसमोर देखील एकमेवाद्वितीय आहे.

श्रेया बुगडे ने ‘चला हवा येऊ द्या’ च्या आधीही तू तिथे मी, माझे मन तुझे झाले, छुत्ता छेडा (गुजराती मालिका), थोडा है, बस थोडे की जरुरत हैं (हिंदी मालिका) यांसारख्या मालिकांमधून काम केले आहे.

तिच्या उत्तम अभिनयाची चुणूक या मालिकांमधून आपल्याला पाहायला मिळते. ‘चला हवा येऊ द्या’ मधील तिचं विनोदाचं टायमिंग वाखाणण्याजोगं आहे. पण खूप कमी जणांना हे माहीत आहे की श्रेया ने बालकलाकार म्हणूनही काम केले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shreya Bugde Sheth🦄 (@shreyabugde)

श्रेया जेव्हा १०-१२ वर्षांची होती तेव्हा मीना नाईक यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘वाटेवरती काचा गं’ या नाटकात काम केलं होतं. हे नाटक डॉ. अनिल बांदिवडकर यांनी लिहिलं होतं. या नाटकात तिच्यासोबत काम करणारी अजून एक बालकलाकार म्हणजे ‘दे धक्का’ चित्रपटातील अभिनेत्री गौरी वैद्य. अभिनेत्री मानव नाईक च्या आई म्हणजेच या नाटकाच्या दिग्दर्शिका मीना नाईक यांनी देखील या नाटकात काम केलं होतं. या नाटकाचं अजून एक वैशिष्टय म्हणजे या नाटकात एकही पुरुष पात्र नाही.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shreya Bugde Sheth🦄 (@shreyabugde)

श्रेयाने या नाटकात ‘मयूरी’ हे पात्र साकारलं होतं. त्यावेळी अर्थातच तिच्या या कामाची खूप स्तुती झाली होती. ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ म्हणतात. तसंच श्रेयाचं अभिनय कौशल्य या नाटकातून पाहायला मिळालं.

हे नाटक यूट्यूब वर देखील उपलब्ध आहे. मोठा चाहतावर्ग असूनही अजूनही श्रेयाचे पाय जमिनीवर आहेत. सेट वर ती सर्वांशी मिळून मिसळून राहते.

डिसेंबर २०१५ मध्ये तिने निखिल सेठ बरोबर लग्न केले. निखजील कार्यकारी निर्माता असलेल्या एका मालिकेदरम्यान दोघांची ओळख झाली. निखिलने श्रेयाला मागणी घातली आणि मग घरच्यांच्या संमतीने हा शुभविवाह पार पडला. निखिलने श्रेयाला काम करण्याची दिलेली मोकळीक आणि तिच्यावर दाखवलेला विश्वास यामुळेच ती चांगले काम करू शकते, असे तिचे म्हणणे आहे. तिच्या घरच्यांचा देखील तिच्या ऍक्टिंग करिअर ला पाठींबा आहे.

You might also like