एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

शूटिंग दरम्यान न्यूयॉर्क मध्ये प्रियांका सोबत झाले असे काही कि, ते फोटो होत आहेत वायरल..

प्रियांका चोप्रा यशस्वी आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तसेच ती हॉलिवूड मध्ये हि काम करणारी अभिनेत्री आहे. तिचा ‘बेवॉच’ हॉलिवूड चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही, तरी हि तिला काही फरक पडला नाही. नंतर तिला हॉलिवूड मध्ये आणखीन २ चित्रपट मिळाले. यातील एक चित्रपट म्हणजे ‘Isn’t it ro mantic?’ मधील तिची काही छायाचित्रे सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली होती.

या चित्रपटाचे शूटिंग करत असतानाची काही छायाचित्रे समोर आली होती. या छायाचित्रांमध्ये प्रियांकाने गुलाबी रंगाचा डीप नेक ड्रेस घातला होता. या चित्रपटामधील अभिनेता अ‍ॅडम डिव्हिनसुद्धा तिच्या सोबत दिसला होता, परंतु समोर आलेली छायाचित्रे सर्वाना आश्चर्यचकित करणारी होती. हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता.

नावानुसार, हा हॉलिवूड शैलीतील एक रोमँटिक चित्रपट आहे. प्रियंका आणि अ‍ॅडम डेव्हिनची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे जिथे अ‍ॅडम डेव्हिनने तिला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. या चित्रपटामधील एक सीन असा आहे कि कॉफी टेबलवर प्रियांका बसून काहीतरी खात आहे. मग त्यातील काही तरी पदार्थ प्रियंका चोप्राच्या गळ्यात अडकतो. नंतर अभिनेता अ‍ॅडम डेव्हिन तिथे पोहोचतो आणि प्रियंकाला वाचविण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर प्रियंका त्याचे प्राण वाचविल्याबद्दल अभिनेता अ‍ॅडम डेव्हिन आभार मानते.

या चित्रपटाच्या या सीनचे शूट न्यूयॉर्क मधील एका प्रसिद्ध रेस्टोरंट मध्ये करण्यात आले होते. परंतु या सीनचे फोटो मात्र इंटरनेट वर सर्वत्र वायरल झाले होते.

या चित्रपटामध्ये प्रियांका चोप्राने योग दूताची भूमिका साकारली होती, आणि अभिनेता अ‍ॅडम डेव्हिन सोबत या चित्रपटात रिबेल विल्सन आणि लियाम हेम्सवर्थ सारख्या कलाकारांचा हि समावेश होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्ट्रॉस शुल्सन यांनी केले आहे तर चित्रपटाची पटकथा एरिन कार्डिलो, डाना फॉक्स, कॅटी सिल्बरमन आणि पॉला पेल यांनी लिहिली आहे.

मित्रांनो आशा आहे की आपल्याला आमचा हा लेख नक्की आवडला असेल. आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like