एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

मराठमोळी क्रिकेट स्मृती मंधनाला आवडतो असा मुलगा, चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना केला स्वतः खु’लासा.

सध्या भारताचे दोन्ही क्रिकेट संघ- महिला आणि पुरुष- इंग्लंडमध्ये दौऱ्यावर आहेत. आपल्याकडे फिल्मी सेलिब्रेटी इतकेच क्रिकेट खेळाडूंनाही प्राधान्य दिलं जातं. कारण सिनेमा आणि क्रिकेट हे भारतीयांचे आवडते विषय आहेत. क्रिकेट खेळाडूंना सेलिब्रेटी सारखाच मान मिळतो आणि तेवढंच प्रेमही मिळतं.

आधी फक्त पुरुष क्रिकेट खेळाडूंच्या वाट्याला येणारे हे प्रेम आता महिला क्रिकेट खेळाडूंना देखील अनुभवायला मिळतंय. त्यांची कामगिरी पाहता त्यांनी स्वतःच्या कष्टाने मिळवलेला हा मान आणि प्रेम दिवसेंदिवस वाढतानाच दिसतंय.

महिला क्रिकेट संघाच्या सर्वच खेळाडू क्रिडा रसिकांच्या लाडक्या असल्या तरी स्मृती मंधनावर लोकांचे जरा जास्तच प्रेम आहे. अर्थातच, तिच्या मैदानावरील खेळाबरोबर तिच्या मैदानाबाहेरच्या आयुष्याबद्दलही जाणून घेण्यात फॅन्सना उत्सुकता आहे.

स्मृती नेटिझन्स मध्ये बरीच लोकप्रिय असून तिचे फोटो सोशल मीडिया वर व्हायरल होत असतात. ‘नॅशनल क्रश’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्मृतीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तिच्या फॅन्स मध्ये नेहमीच उत्सुकता असते. तिच्या एका चाहत्याने तिला सोशल मीडिया वर एक प्रश्न विचारला आणि स्मृतीने त्याचे उत्तरही देऊन टाकले!

 

View this post on Instagram

 

A post shared by Smriti Mandhana (@smriti_mandhana)

तिच्या चाहत्याने तिला तिच्या लाईफ पार्टनर बद्दलच्या अपेक्षा विचारल्या. “तुला लाईफ पार्टनर कसा हवा?” असे विचारले असता स्मृतीने स्पष्ट शब्दात आपले म्हणणे मांडले. तिने याबाबत आपल्या दोन अटी सांगितल्या. ती म्हणाली, “एक म्हणजे त्यानं माझ्यावर प्रेम केलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे त्यानं पहिली अट पाळली पाहिजे.” काय हवं अजून आपल्या जोडीदाराकडून! प्रेमावरच नातं टिकून असतं आणि स्मृतीने हीच गोष्ट आपल्या ट्विट मधून अधोरेखित केली आहे.

जून २०१८ मध्ये स्मृती मंधनाला बीसीसीआय (BCCI) तर्फे ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू’ चा सन्मान प्रदान करण्यात आला. त्याच वर्षी म्हणजे डिसेंबर २०१८ मध्ये आयसीसी (ICC) ने तिला ‘बेस्ट फिमेल क्रिकेटर ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित केले. त्याच वेळी तिला आयसीसी (ICC) कडून ‘ओडीआय प्लेयर ऑफ द इयर’ चा सन्मानही प्रदान करण्यात आला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Smriti Mandhana (@smriti_mandhana)

स्मृतीला तिच्या या क्रिकेट करिअर मध्ये तिच्या कुटुंबाचा फार मोठा पाठींबा आहे. तिचे वडील तिचे शेड्युल सांभाळतात, तर तिची आई तिच्या डाएट कडे लक्ष देते. तिचा भाऊ तिला नेहमी प्रॅक्टिस मध्ये मदत करतो. तर अशी ही स्मृती आपल्या कुटुंबाच्या पाठींब्याने नवनवी क्षितिजे ओलांडते आहे. तिच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी आमच्या टीम कडून स्मृतीला खूप शुभेच्छा!

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like