एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील भिंगरी खऱ्या जीवनामध्ये आहे अशी, अशाप्रकारे आली टिव्हीवर, ऐकून विश्वास बसणार नाही..

स्टार प्रवाहने गेल्या काही महिन्यांत अनेक नवीन मालिकांचा प्रवाह आणला आहे. दर दोन ते तीन महिन्यांनी नवीन मालिका या वाहिनीवर येताना दिसत आहे. याचे कारण लोकांचं या वाहिनीला आणि त्यावरील मालिकांना भरभरुन प्रेम मिळत आहे. या वाहिनीवरील सध्या प्रचंड गाजत असलेली मालिका म्हणजे फुलाला सुगंध मातीचा ही होय.

या मालिकेचे शिर्षकगीत युट्यूबवर प्रचंड व्हायरल झाले आहे. शिर्षकगीताचं संगीत अर्थातच मेलडी किंग निलेश मोहरीर याने केलं आहे. पण याबरोबरच मालिकेतील पात्रंसुद्धा चर्चेचा विषय ठरली आहेत. असेच एक पात्र जे लोकांना आवडत आहे ते म्हणजे भिंगरी.

भिंगरी हे फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील अत्यंत नखरेबाज आणि हौशी पात्र आहे. भिंगरी हे पात्र मनाने खूप चांगले आहे. सर्वांच्या जवळचे आहे. भिंगरी ही सगळ्यांवर प्रेम करते. घरातली सगळी कामे करते. सर्वांच्या आज्ञेत राहते. त्यामुळे सगळ्यांचीच भिंगरी ही फेव्हरेट झाली आहे.

प्रत्येक मालिकेत वाईटाबरोबर भिंगरीसारखं एखादं तरी नितळ-निर्मळ पात्र असतच. त्यामुळे समतोल साधला जाऊन कथेला अर्थ प्राप्त होतो व प्रेक्षकांना वाईट आणि चांगले यातला फरक कळून येतो.

याच भिंगरीची खऱ्या आयुष्याने मात्र चांगलीच भिंगरी घेतली आहे पण ती त्यात उत्तीर्णही झाली आहे. भिंगरी चे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव निकीता पाटील असे आहे. निकिता ही मूळची जळगाव इथली आहे. निकिता हिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती आणि तिला अभिनेत्रीच व्हायचे होते. ती त्याच दिशेने प्रयत्न करत राहिली. तिने तिच्या कॉलेजवयात नाटकांमधेही काम केले आहे. तिने इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन्स मधून पदवी घेतली आहे. पण त्यानंतर तिने अभियंता हे क्षेत्र न स्विकारता स्वतःच्या आवडीचा विचार करून अभिनयाचा पर्याय निवडला.

तिने अनेक मालिकांच्या अॉडीशन्स दिल्या व शेवटी तिच्या प्रयत्नांना यश मिळून तिला फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत भिंगरी हे पात्र निभवण्याची संधी मिळाली. यश मिळणे हे आपल्या प्रयत्नावर अवलंबून असते. स्वतःच्या कौशल्यावर असलेला विश्वास आणि ठरवलेले उद्दिष्ट गाठण्याची जिद्द हीच खरी यशाची चावी आहे. मग क्षेत्र कुठलही असो!

आपल्या घरचा माणूस जर अभिनय क्षेत्रात असेल तर नक्कीच आपल्यालाही बरच काही शिकायला मिळतं. नेमके हेच निकीता पाटील हीची धाकटी बहिण परी पाटील हीच्या बाबतीत घडताना दिसून आले. परी पाटील हीने स्वतःच्या बहिणीकडून प्रेरणा घेऊन तिचे स्वतःचे युअयुब चॅनेल सुरू केले आणि ते आता दणक्यात व्हायरल होत आहे. ती देखील एक दिवस स्वतःच्या बहिणीइतके यश मिळवेल यात शंका नाही.

सध्या लॉक-डाऊनमुळे अनेक जणांचा ओढा वेब सिरीज आणि मालिका यांच्याकडे वाढला आहे. सर्वजण दिवसभर घरीच राहत असल्याने या काळात मालिका प्रचंड पाहिल्या जात आहेत. त्यामुळे त्यातील पात्रांविषयी प्रत्येकालाच जाणून घ्यायला आवडत आहे. अशाच नवख्या, सुंदर आणि अफलातून पात्राला आम्ही तुम्हाला असेच भेटवत राहू. फक्त तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहचवत राहा.

You might also like