एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

कुंभमेळ्यात दिसणारे नागा साधू होण्यासाठी द्यावी लागते परिक्षा? जाणून घ्या नागा साधूंची संपूर्ण माहिती..

भारत हा सांस्कृतिक देश आहे. अनेक परंपरांनी आणि सण-उत्सवांनी नटलेला देश आहे. सर्व राज्यांमधे वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात. लोकांमधे या सणांमुळे आणि परंपरांमुळे चैतन्य टिकून राहते. अशीच एक देदीप्यमान परंपरा म्हणजेच कुंभमेळा.

आपल्या देशात कुंभमेळा हा मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा केला जातो. देशाच्या विविधा भागांतून लोक यात सामील होताना दिसतात. यात प्रामुख्याने साधू, बाबा, बुवा, महाराज यांचे प्रमाण जास्त असते. याचप्रकारे कुंभमेळ्यात नागा साधू नियमितपणे दिसून येतात. चला तर जाणून घेऊया नागा साधूंची इत्थंभूत माहिती.

यावर्षीचा कुंभमेळा हरिद्वार ये ११ ते १६ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला होता व तो यथासांग पारही पडला. कोवीडच्या काळात अशाप्रकारचा कुंभमेळा भरवणे कितपत योग्य किंवा अयोग्य यावरून बरीच राळ उडवण्यात आली. पण हा मुद्दा सोडल्यास या कुंभमेळ्या दरम्यानसुद्धा अनेक नागा साधू दिसून आले. हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर नक्की कुठे गायब होतात आणि काय करतात यावरूनही चर्चा रंगली.

तर नागा साधू ही एक विशिष्ट जमात आहे. अशाप्रकारचा नागा साधू व्हायचे असल्यास नागा आखाड्यात उतरावे लागते. त्यानंतर नागा साधू होण्यासाठी आवश्यक असलेली अध्यात्मिक परीक्षा द्यावी लागते. हे काम इतकं सहज नाही. यात तुमची श्रद्धा, वैराग्य पत्करण्याची क्षमता आणि एकूण या निर्णयामागची भूमिका या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. त्यानंतरच हे नागा साधू तुम्हाला त्यांच्यात येण्याची अनुमती देतात. मग तुम्हाला जन्मभर नागा साधू बनूनच राहावे लागते.

फक्त परीक्षेत पास होऊन किंवा अटी मान्य करून भागत नाही तर तुम्हाला उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची दीक्षा घ्यावी लागते. अनेक गोष्टी शिकाव्या लागतात. आत्मसात कराव्या लागतात. हे करण्याचा कालावधी सुमारे ६ ते १६ वर्ष इतका असू शकतो.

एकदा दीक्षा घेऊन झाली की मग तुम्ही खऱ्या अर्थाने नागा साधू म्हणून ओळखले जाता. हे साधू अंगाला भस्म लावतात. ही भस्म म्हणजे माणसांची राख असते. अशाप्रकारे भस्म लावून ते हिमालय, काशी यांसारख्या पहाडी भागात वास्तव्य करतात.

आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे हे नागासाधू तिथे हिमालयात गुफा करून राहतात. तिथे येणार्‍या प्रत्येक संकटावर मात करतात. कुठल्याही गोष्टीची तमा आणि जबाबदारीचे ओझे नसल्याने ते विनासक्त झालेले असतात.

त्यामुळे त्यांचे मृ-त्यूचे भय दूर होऊन त्यांच्यात एक कणखरता आलेली असते. त्यामुळेच ते अशा राहणीमानाला पुरक नसलेल्या जागेवरही तंबू ठोकून मृ-त्यूला आवाहन देत वर्षानुवर्षे तग धरुन राहतात. नागा साधूंच्या या सवयींमुळे त्यांचे जीवन रहस्यमय बनले आहे. त्यामुळे चंद्रमुखी सारख्या अनेक चित्रपटात नागा साधूंचे संदर्भ आपल्याला गवसतात. लोकांना त्यांच्याबाबत नेहमीच उत्सुकता असते. या साधूंचा जीवनकाळ सामान्यांपेक्षा खूप जास्त असतो.

हे नागा साधू योग, ध्यान धारणा, भटकंती करत असतात. त्यामुळे दिवसातून फक्त एकदाच जेवतात आणि फक्त तीन वेळा पाणी पितात. असे असूनही ते जगतात. नागा साधू दरवेळी नियमितपणे कुंभमेळ्यात येतात.

तिथे पवित्र स्नान करतात आणि परत आपल्या जागी परततात. रानोमाळ भटकंती करतात. फक्त कुंभमेळ्यादरम्यानच सामान्यांना त्यांचे दर्शन घडते. अशाच बातम्यांसाठी आमचे लेख नक्की वाचत राहा. लाईक करा. तुमच्या मित्रांमधेही नागा साधूंविषयी चर्चा करा. काही नवीन कळाले तर आम्हाला कळवायला विसरू नका.

You might also like