एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

नवऱ्यासोबत २ कोटींच्या गाडीमधून फिरते ‘सपना चौधरी’, डांसिंग क्वीनची कमाई जाणून डोळे पांढरे कराल..

मशहूर हरियाणवी गाणे “तेरी आंख्या का यो काजल” मधून जगभरात आपली ओळख निर्माण करणारी बहुचर्चित डांसर सपना चौधरी हिला खूप लोकांनी आपल्या हृदयात जागा दिली आहे. तसेच ती तिच्या फॅन्स च्या मनावर नेहमीच राज्य करते. सपनाच्या डान्सिंग मूव्ह वर तर देशातील सर्व लोक वेडे आहेत. एकेकाळी पोट भरण्यासाठी पैसे नसणारी सपना चौधरी आज कोट्यवधी रुपयांची मालकिन असून राजेशाही जीवन जगते. सपनाकडे स्वतःचे आलिशान घरच नाही तर तिच्याकडे खूपच लक्झरी कार आहेत ज्यात ती तिचा नवरा वीर साहू सोबत प्रवास करते. तर मग जाणून घेऊया सपना चौधरी यांच्या नेट वर्थबद्दल.

कशी झाली करियर ची सुरवात :
सपना चौधरीचा जन्म २५ सप्टेंबर १९९० मध्ये झाला. घराच्या परिस्थितीमुळे सपना फक्त आठवीत शिकू शकली. घराला आधार देण्यासाठी सपनाने ऑ’र्केस्ट्रा टीमबरोबर काम करण्यास सुरवात केली. यानंतर ती स्टेज डान्सर झाली आणि लोकांच्या मध्ये स्टेजवर नाचू लागली. सपना सौधरीचे पहिले गाणे, “तेरी आंख्या का यो काजल” इतका सुपरहिट झाला की त्यानंतर तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच गेली. सपनाचे हे गाणे लोकांमध्ये खूप हिट झाले. त्यामुळे सपनाला एक वेगळी ओळख मिळाली. या गाण्यानंतर सपनाला बर्‍याच मोठ्या ऑफर्स येऊ लागल्या आणि तिचे नशीब चमकले.

‘तेरे ठुमके सपना चौधरी’ नावाच्या आय’टम नंबर वर सपनानेही डान्स केला. आजही सपनाचे बरेच डान्स व्हिडिओ आहेत जे बरेच जुने आहेत, तरीही ते सोशल मीडियावर खूपच वायरल होत असतात.

डांसिंग क्वीन एका महिन्यात किती पैसे कमवते ?
जेव्हा सपनाचे करियर एकदम फिट झाले. त्यानंतर सपनाने २०२० मध्ये वीर साहूशी जगाला न माहिती देता लग्न केले आणि सपनाने सुंदर मुलाला जन्म दिला. यावेळी सपनाची पॉपुलैरिटी बॉलिवूड स्टार्सना टक्कर देत आहे. ती बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि सपना एका शोसाठी सुमारे ५ लाख रुपये घेते, त्यानुसार जोडल्यास सपना एका महिन्यात तब्बल एक कोटी रुपये मिळवते. परंतु तिची फीची पुष्टी पूर्णपणे झालेली नाही.

नेटवर्थ किती आहे ?
एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सपना चौधरीची एकूण मालमत्ता ५० कोटींपेक्षा जास्त आहे, तर दुसर्‍या साइटवर असे सांगण्यात आले आहे की तिची एकूण संपत्ती सुमारे १० ते २० कोटी आहे. सपना आता खूप रॉयल आयुष्य जगते. दिल्लीच्या नजफगडमध्ये सपनाचा एक कोटी रुपयांचा बंगला असून ती तेथे राहते. तसेच सपनाकडे बर्‍याच गांड्या आहेत. तिच्याकडे ऑडी ते फॉर्च्यूनर, क्यू 7 आणि बीएमडब्लू ७ सीरीज पर्यंत महागड्या गाड्या आहेत.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like