एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

कुणीतरी येणार येणार गं…! या अभिनेत्रीच्या डोहाळजेवणाचे फोटो होत आहेत व्हायरल…

आई होणं हा कोणत्याही स्त्री साठी एक आनंदाचा क्षण असतो. नऊ महिने पोटात वाढणाऱ्या जीवाला ती जीवापलीकडे जपत असते. अर्थात सगळ्या घरासाठीच ही बातमी म्हणजे आनंदसोहळा असतो. आपले गरोदरपण अनुभवणाऱ्या प्रत्येक स्त्री साठी येणारा प्रत्येक दिवस एक नवा अनुभव घेऊन येत असतो.

ती स्त्री कोणीही असो, कोणत्याही क्षेत्रातली असो, तिच्यासाठी आईपण ही मोठी देणगी असते. तशीच ती तिची सत्वपरीक्षादेखील असते.

हे गर्भारपण साजरं करण्यासाठी आपल्याकडे एक खूप छान कार्यक्रम आहे. डोहाळजेवण. होणाऱ्या आईचे डोहाळे पुरवणं हे तिचे एक प्रकारे कौतुक करण्यासारखेच आहे.

नुकताच एका मराठी अभिनेत्रीने आपला हा डोहाळजेवणाचा कौतुकसोहळा सोशल मीडिया वर पोस्ट केला. तिच्या त्या पोस्ट वर अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ही अभिनेत्री आहे दीपश्री माळी.

दीपश्रीने नुकत्याच पार पडलेल्या आपल्या डोहाळजेवणाचे फोटो इंस्टाग्राम वर टाकले आहेत. साधारण चार वर्षांपूर्वी दीपश्रीने अमेय माळीसोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर देखील या अभिनेत्रीने संसार सांभाळत आपली अभिनयाची आवड कायम ठेवली. तिने विविध चित्रपट आणि मालिकांमधून काम करणे सुरू ठेवले. झी युवा वाहिनीवरील ‘गर्ल्स हॉस्टेल’ या मालिकेतल्या तिच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले.

झी युवा वाहिनीवर प्रसारीत होणाऱ्या अजून एका मालिकेमध्ये दीपश्रीने काम केले आहे. ती मालिका होती ‘एक घर मंतरलेलं’. या मालिकेत सुरुची आडारकर आणि सुयश टिळक प्रमुख भूमिकेत होते.

या दोघांची प्रमुख भूमिका असणारी ही दुसरी मालिका आहे. त्या आधी त्यांनी झी मराठी वाहिनीवरील ‘का रे दुरावा’ या गाजलेल्या मालिकेत प्रमुख व्यक्तिरेखा निभावल्या होत्या.

दीपश्री सोशल मीडिया वर खूप सक्रीय असते. ती सतत काही ना काही शेअर करत असते. तिने शेअर केलेल्या या डोहाळजेवणाच्या फोटोंना खूप सारे लाईक्स येत आहेत.

सुयश टिळक सारख्या तिच्या सहकलाकारांनीसुद्धा तिच्या या पोस्ट वर कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोंमध्ये नव्या पाहुण्याच्या आगमनाची दीपश्रीला किती आतुरता आहे हे आपण पाहू शकतो.

तिच्या या गोड प्रवासासाठी आणि तिच्या आयुष्यात येणाऱ्या या छोट्या पाहुण्यासाठी आमच्या टीम कडून दीपश्री माळीला खूप शुभेच्छा! अशा नवनवीन गोष्टींची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतच असतो. त्यासाठी तुम्हाला आमच्या वेबसाइट ला भेट देऊन आमचे लेख नियमितपणे वाचावे लागतील. आमचे लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

You might also like