एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अभिनंदन! रोबोट फेम डायरेक्टर एस शंकर यांच्या कन्येचा विवाह, तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची हजेरी..

तमिळ चित्रपटसृष्टीला अनेक बिग बजेट आणि हिट सिनेमे देणाऱ्या डायरेक्टर एस शंकर यांच्या मुलीचा विवाह नुकताच पार पडला. को-रो-ना निर्बंधांमुळे फार मोठ्या प्रमाणात हा लग्नसोहळा आयोजित केला नसला तरी या समारंभाला हजेरी लावलेल्या पाहुण्यांनी मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

एस शंकर, ज्यांना फिल्म इंडस्ट्री मध्ये फक्त ‘शंकर’ या नावानेदेखील ओळखले जाते, यांची मोठी मुलगी ऐश्वर्या शंकर हिचा विवाहसोहळा २७ जून २०२१ रोजी पार पडला. ऐश्वर्याचे लग्न क्रिकेटर रोहित दामोदरन याच्याशी झाले आहे. ऐश्वर्या ही पेशाने डॉक्टर आहे, तर रोहित दामोदरन क्रिकेटमध्ये बॅट्समन आहे.

हा लग्नसोहळा काही मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत चेन्नई मधील वेलकम हॉटेल मध्ये पार पडला. लग्नाला मुलाकडची आणि मुलीकडची जवळची मंडळी आणि केवळ काही मित्रमंडळी उपस्थित होती.

एस शंकर त्यांच्या ‘रोबोट’ (२०१०) चित्रपटामुळे बरेच चर्चेत आले. ‘जेंटलमॅन’ (१९९३) या चित्रपटाच्या दिग्दर्शनाने त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. या चित्रपटासाठी त्यांना त्या वर्षीचा फिल्मफेअर बेस्ट डायरेक्टर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतातल्या सर्वाधिक मोबदला घेणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये शंकर यांचे नाव घेतले जाते.

त्यांनी इंडियन (१९९६), जीन्स (१९९८), अन्नीयन (२००५), शिवाजी- द बॉस (२००७) आणि २.० (२०१८) यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अभिनेते होण्याची इच्छा असूनही शंकर यांनी दिग्दर्शनाकडे आपला मोर्चा वळवला आणि त्यात यशही मिळवले. एस शंकर केवळ एक यशस्वी दिग्दर्शक नसून त्यांच्या बऱ्याच चित्रपटांची निर्मिती आणि लेखनही त्यांनी केले आहे.

शंकर यांच्या मुलीच्या लग्नासाठी काही राजकारणी मंडळींनी देखील हजेरी लावलेली दिसली. यामध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन, आरोग्यमंत्री एम. ए. सुब्रमण्यम आणि विधानसभा सदस्य आणि अभिनेता उदयनीधी स्टालिन यांनी या लग्नाला उपस्थिती लावत वधू-वरांना आशीर्वाद दिला. या लग्नसमारंभाचे फोटो सोशल मीडिया वर व्हायरल होत असून प्रेक्षकांनीदेखील वधू-वरांना आशीर्वाद देत त्यांच्या मंगलमय आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

को-रो-ना निर्बंधांमुळे हे लग्न आता जरी मोजक्या मंडळींच्या सहभागात पार पडलं असलं तरी निर्बंध उठल्यानंतर ऐश्वर्या आणि रोहित लवकरच एका मोठ्या रिसेप्शन पार्टीचे आयोजन करणार आहेत. त्यांच्या या रिसेप्शन मध्ये सेलिब्रेटीज्, चित्रपटसृष्टीतील कलाकार, नातलग आणि मित्रमंडळी यांसारख्या अनेक मंडळींचा सहभाग असेल असे बोलले जात आहे.

आमच्या टीम कडून देखील ऐश्वर्या आणि रोहितच्या भावी सुखी संसारासाठी हार्दिक शुभेच्छा!

You might also like